पालघर एमआयडीसीतील कारखान्यात पुन्हा एकदा वायुगळती; तीन कामगारांचा मृत्यू झाला
योगेश पांडे / वार्ताहर
पालघर- पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्यात पुन्हा एकदा वायुगळती झाली आहे. बोईसर तारापूर एमआयडीसीतील प्लॉट नंबर एफ १३ मधील मेडली फार्मासिटिकल्स लिमिटेड या कंपनीत वायुगळती झाली आहे. या वायुगळतीमुळं आठ कामगारांना बाधा झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, यामध्ये तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर पाच कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान जखमी कामगारांवर बोईसरमधील शिंदे या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीत अशा प्रकारच्या दुर्घटना वारंवार घडत आहेत. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने कामगारांना जीव गमवावे लागत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.