अनैतिक संबंधातून गर्भवती राहीलेल्या अल्पवयीन मुलीने बाळाला फेकले कचऱ्यात; २२ वर्षीय तरुणाला अटक

Spread the love

अनैतिक संबंधातून गर्भवती राहीलेल्या अल्पवयीन मुलीने बाळाला फेकले कचऱ्यात; २२ वर्षीय तरुणाला अटक

योगेश पांडे / वार्ताहर 

कल्याण – एका १५ वर्षाच्या तरुणीचे एका २२ वर्षाच्या तरुणा सोबत अनैतिक संबंध होते. या संबंधातून ती गर्भवती राहीली होती. त्यानंतर त्या मुलीने एका मुलीला जन्मही दिला. त्यानंतर जन्माला घातल्या त्या मुलीला कचऱ्याच्या डब्ब्यात फेकून देण्यात आलं. ही धक्कादायक घटना कल्याणच्या बारावे परिसरात घडली. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी नवजात मुलीला फेकणाऱ्या आरोपीला शोधून काढले आहे. १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत शारीरीक संबंध ठेवले होते. त्यातून ती गर्भवती झाली. तिची प्रसूती झाली. तिला झालेल्या नवजात मुलीस फेकून देण्यात आलं. या प्रकरणात रोहीत प्रदीप पांडे या २२ वर्षीय तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात रोहित याच्या आई वडिल आणि अल्पवयीन मुलीच्या आजीच्या विरोधात ही अटकेची कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काही दिवसापूर्वी कल्याण पश्चिमेतील बारावे परिसरात मंदिरानजीक कचऱ्यात एका बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. नागरीकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी त्याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने त्याठिकाणी जाऊन नवजात बाळाला ताब्यात घेतले. नवजात बाळ हे मुलगी असल्याने तिला प्रथम उपचारासाठी रुग्णलायात दाखल केले. एक दिवसाची मुलगी ही सध्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णलयात आहे.

या मुलीला कचऱ्यात फेकून देणाऱ्या तिच्या पालकांचा शोध सुरु करण्यात आला. मुलीचे पालकत्व लपविण्याच्या उद्देशातून हा प्रकार घडला असल्याने पोलिसांनी त्या अंगाने तपास सुरु केला. पोलिसांनी तपासाच्या आधारे रोहित पांडे या २२ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. रोहित याचे एका अल्पवयीन १५ वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्यातून अल्पवयीन मुलीने एका मुलीला जन्म दिला. पालकत्व लपविण्यासाठी नवजात एक दिवसाच्या मुलीला कचऱ्यात फेकून दिले. पोलिसांनी रोहितला अटक केली आहे. संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याने रोहितच्या विरोधात पोक्सा कायद्यान्वये कारवाई केली जाणार आहे. सध्या नवजात मुलीच्या अल्पवयीन आईला पोलिसांनी ठाण्याच्या सिव्हील रुग्णलयात उपचारासाठी ठेवले आहे. प्रसूतीनंतर तिला रक्तस्त्राव होत असल्याने तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणात पोलिस संबंधित आरोपी व अल्पवयीन तरुणाची डीएनए टेस्ट करणार आहेत. पोलिस या प्रकरणात आरोपी तरुणाच्या आई वडिल आणि मुलीच्या आजीच्या विरोधातही कारवाई करणार आहे. या प्रकरणाचा तपास खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी मारुती आंधळे हे तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon