व्यावसायिकाच्या बंद घराच्या खिडक्या तोडून तब्बल १ किलो ५५ ग्रॅम सोने लंपास करणाऱ्या चोरट्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून तिघांच्या आवळल्या मुसक्या
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – मनमाड शहरातील डांबरे कॉलनी परिसरात व्यावसायिक मुर्तुजा रस्सीवाला यांच्या बंद घराचे खिडक्या तोडून घरातील तब्बल १ किलो ५५ ग्रॅम सोने व काही रोकड चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती दरम्यान नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी नव्याने दाखल झालेले बाळासाहेब पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्याची उकल करण्याच्या सूचना दिल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आपलं कौशल्य वापरत सिनेस्टाईल पद्धतीने त्यांचा पाठलाग करून संजय किशोर गायकवाड व राकेश अशोक संसारे दोघे राहणार मनमाड व राजेश राम शंकर शर्मा राहणार नाशिक या तिघांना ताब्यात घेत चोरी गेलेले १ किलो ५५ ग्रॅम सोने ज्याची बाजारात किंमत १ कोटी ५ लाख ४० हजार इतकी असून हे हस्तगत केले असून या कारवाई बद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे परिसरात कौतुक होत आहे. मनमाड शहरातील कॅम्प परिरात असलेल्या डमरे कॉलनीत अल्युमिनियम चे दरवाजे, खिडक्या बनविणारे व्यापारी मुरतुजा रस्सीवाला यांचा वर्कशॉप असून थोड्या अंतरावर ते राहत असलेला बंगला आहे मुरतुजा हे रविवारी ८ जून च्या रात्री आपल्या आईला आणण्यासाठी आर्वी येथे गेले होते त्यानंतर सोमवारी दुपारी त्यांची पत्नी आणि मुलगा हे घरी आले व नंतर संध्याकाळी नाशिकला गेले. त्यानंतर बुधवारी सकाळी ६ वाजता मुरतुजा हे घरी आले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की घरात चोरी झाली. विशेष म्हणजे घराच्या मुख्य दरवाज्याला लावलेला लॉक तसाच होता चोरांनी बंगल्याच्या माघील बाजूला असलेल्या खिडकीचे गज कट करून आत प्रवेश केला. त्यांच्या बेडरूम मध्ये असलेल्या कपाटाचे दरवाजे तोडून त्या मध्ये ठेवलेले १ किलो ६०० ग्राम सोन आणि ८ लाख रोख रक्कम चोरून पसार झाले. या प्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
बंगल्याच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीचे गज कापून घरफोडी करण्यात आली असून या घरफोडी १ किलो ६०० ग्राम सोन आणि ८ लाख रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केले या घटनेची माहिती मुरतुजा आणि पोलिसांना दिल्यानंतर नाशिक येथील डॉग स्कोड , फॉरेन्सिक टीम यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली होती.