मुंबईतील परळमध्ये वॉचमनकडून मुलींचा विनयभंग; आरोपी पोलीसांच्या ताब्यात
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईत तीन अल्पवयीन मुलींचा बिल्डिंगच्या वॉचमनने विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. परळ भोईवाडा येथे हा धक्कादायक प्रकार घडला.
बुधवारी रात्री परळ भोईवाडा येथील राहत्या इमारतीखाली ११ वर्षाच्या तिन्ही मुली आल्या असताना आरोपी जयराम बेटकर याने त्यांच्यासोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती एका मुलीने घरी सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. एका मुलीच्या आईने भोईवाडा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी बेटकरवर कलम ७४ बीएनएस, सह ८, १२ पोस्को कायदा २०१२ बीएनएस २०२३अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गुरुवारी पहाटे आरोपी जयराम बेटकर याला अटक केली असून भोईवाडा पोलिस अधिक तपास करत आहेत.