भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षावर विनयभंगाचा गुन्हा दाखल, महिलेला मारहाण केल्याचा आरोप
पोलीस महानगर नेटवर्क
पालघर – भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमिनीच्या वादातून महिलेला केली मारहाण केली होती. मारहाण करताना महिला विवस्त्र झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तर दुसऱ्या सीसीटीव्हीत मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
नंदकुमार पाटील पालघरचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. सध्या नंदकुमार पाटील यांच्यावर लोकसभा संघटक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. नंदकुमार पाटील यांच्यासह त्यांच्या भावांवर वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर वाडा पोलीस अधिकचा तपास देखील करत आहेत. कारण दोन सीसीटीव्ही समोर आले आहेत. नेमका जमिनीचा वाद काय आहे, याची देखील माहिती पोलिस घेत आहेत. राज्यात महिलांवर होत असलेले हल्ले धक्कादायक असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.