बहिणीची छेड काढण्यावरून वाद टोकाला, तरुणाची निर्घृणपणे हत्या; आई आणि भावाला अटक

Spread the love

बहिणीची छेड काढण्यावरून वाद टोकाला, तरुणाची निर्घृणपणे हत्या; आई आणि भावाला अटक

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – पुण्यात एक खळबळजनक घटना घडलीये. चक्क एका मुलाने आणि आईने मिळून भर रस्त्यावर फरशीच्या तुकड्याने एका तरूणाची हत्या केली. हैराण करणारे म्हणजे किती क्रूरपणे ही हत्या करण्यात आलीये, हे व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवरून स्पष्ट दिसतंय. गुरुवारी रात्री चंदनगर परिसरात एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. प्रदीप बाबासाहेब अडागळे (वय २२, रा. आभाळवाडी, वाघोली) असे त्याचे नाव आहे. ऋषी काकडे आणि त्याची आई सुनीता काकडे यांनी हा खून केलाय. ऋषी काकडे आणि सुनीता काकडे या दोघांनी मिळून फरशीचे तुकडे प्रदीप अडागळे याच्या डोक्यात घातली. या घटनेनंतर गंभीर जखमी अवस्थेत प्रदीप अडागळे याला ससून येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी ऋषी काकडे आणि त्याची आई सुनीता काकडे यांना अटक केलीये.

अडागळे हा सतत ऋषी आणि त्याच्या आईला शिवीगाळ करत असे. बहिणीची छेड काढण्याच्या कारणावरुन वाद निर्माण झाला आणि त्यानंतर ऋषी आणि त्याच्या आईने मिळून प्रदीपची हत्या केल्याचे सांगितले जातंय. या प्रकरणाबद्दल बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी सांगितले की, काकडे यांचा भाजीचा व्यवसाय आहे. प्रदीप अडागळे आणि ऋषी काकडे यांच्यात बहिणीची छेड काढल्यावरुन काही दिवसांपासून वाद सुरू होते. याच वादातून चंदननगरमधील टाटा गार्डनजवळ प्रदीप अडागळे याला बोलवण्यात आले होते. यादरम्यान वाद वाढला आणि तिघांनी मिळून प्रदीप अडागळे याच्या डोक्यात थेट फरशीचे तुकडे घालून मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी प्रदीप हा गंभीर जखमी झाला. त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. चंदननगर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, प्रदीपचा मृत्यु झाल्याने खुनाची कलमे वाढवण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon