प्रसिद्ध गायक-संगीत दिग्दर्शक प्रीतमच्या ऑफिसमध्ये चोरी, ४० लाखांची रोकड घेऊन ऑफिस कर्मचारी पसार
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक-गायक प्रीतम चक्रवर्ती याच्या ऑफिसमध्ये लाखो रुपयांची चोरी झाल्याची माहिती आहे. प्रीतम चक्रवर्तीच्या ऑफिसमधील लाखो रुपये घेऊन ऑफिस बॉय पसार झाला आहे. प्रीतमच्या ऑफिसमध्ये ४० लाख रुपये रोकड होती. ४० लाख रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग घेऊन ऑफिस बॉय फरार झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी प्रीतमच्या मॅनेजरने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. प्रीतमच्या कार्यालयातून ऑफिस बॉय ४० लाख रुपये असलेली बॅग घेऊन गायब झाला आणि सध्या त्याचा फोनही बंद आहे. प्रीतम चक्रवर्ती याच्या कार्यालयातून ४० लाख रुपयांची चोरी झाली आहे. या चोरीच्या घटनेबाबत प्रीतमच्या मॅनेजरने मुंबईतील मालाड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. प्रीतमचा मॅनेजर विनीत छेडा याने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं की, काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने प्रीतमच्या कामासाठी ४० लाख रुपये कार्यालयात आणले होते, जे विनीतला मिळाले होते आणि त्याने ते पैसे मुंबईतील कार्यालयात ठेवले होते.
प्रीतमच्या मॅनेजरने हे ४० लाख रुपये त्याच्याकडे सोपवले तेव्हा प्रीतमच्या ऑफिसमध्ये काम करणारा आशिष सायल नावाचा एक व्यक्ती ऑफिसमध्ये उपस्थित होता. प्रीतमचा मॅनेजर काही कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी प्रीतमच्या घरी गेला आणि स्वाक्षरी केल्यानंतर तो ऑफिसमध्ये परतला तेव्हा त्याला दिसले की पैसे असलेली बॅग गायब होती. ऑफिसमध्ये मॅनेजरने त्यांना बॅगबाबत इतर कर्मचाऱ्यांना विचारणा केली, तेव्हा त्यांनी सांगितलं की आशिष सायल पैशांनी भरलेली बॅग घेऊन गेला होता. जेव्हा मॅनेजरने कर्मचाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचा मोबाईल बंद होता. या प्रकरणी प्रीतमच्या मॅनेजरने मुंबईतील मालाड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.