राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ठाणे पोलिसांकडून “एकता दौड”चे आयोजन
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजता “एकता दौड” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच राष्ट्रीय एकतेचा संदेश समाजामध्ये पोहोचवण्यासाठी ही दौड आयोजित करण्यात आली आहे.
या उपक्रमात ठाण्यातील नागरिक, पोलीस दलाचे अधिकारी-कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय तसेच पत्रकार बांधव-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाने केले आहे.
दौडीचा प्रारंभ शिवसमर्थ विद्यालय, ठाणे येथून सकाळी ७ वाजता होणार असून, मार्गिका शिवसमर्थ विद्यालय – मुस चौक – टॉवर नाका – गडकरी रंगायतन सर्कल – शिवसमर्थ विद्यालय अशी असणार आहे. सहभागी नागरिकांनी सकाळी ६.४५ वाजेपर्यंत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक व जनसंपर्क अधिकारी (पोलीस आयुक्तालय, ठाणे शहर) शैलेश साळवी कार्यरत असतील.