पुनर्विवाह पडला महागात; साठ वर्षाच्या जेष्ठाची फसवणूक; सायबर चोरट्यांनी घातला गंडा
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – घटस्फोट झाल्यानंतर त्यांना पूर्नविवाह करायचा होता. त्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर जाहिरात केली. त्यातून सायबर चोरट्याने महिलेला पुढे करुन अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. सायबर चोरट्यांनी त्यांची ७२ हजारांची फसवणूक केली. याबाबत कर्वेनगर येथील एका ६० वर्षाच्या नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मनिषा शर्मा, विक्रम राठोड, राहुल शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा घटस्फोट झाल्याने त्यांना पूर्नविवाह करायचा होता. त्यासाठी त्यांनी फेसबुकवर जाहिरात केली होती. त्यावर प्रतिसाद म्हणून एक फॉर्म आला. फिर्यादी यांनी माहिती भरली होती. त्या माहितीचा वापर करुन मनिषा शर्मा असे नाव सांगणार्या महिलेने त्यांना कॉल केला. व्हॉटसअॅप मेसेजद्वारे लग्नाची अमिष दाखवले. त्यांच्यात व्हॉटसअॅपवर बोलणी सुरु झाली. त्यातून तिने फिर्यादी यांना अश्लिल व्हिडिओ तयार करायला लावला. तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिने बँक खात्यावर पैसे पाठविण्यास भाग पाडले. विक्रम राठोड याने फिर्यादीला कॉल व व्हॉटसअॅप मेसेजद्वारे संपर्क केला. सायबर क्राईम इन्वेस्टीगेशन सेल दिल्ली येथे फिर्यादीविरुद्ध गुन्हा दाखल असल्याचे सांगून भिती घातली. त्याने राहुल शर्मा याच्याशी संपर्क साधावा, असे सांगितले. अन्यथा यु ट्युबवर फिर्यादीचे नग्न व्हिडिओ व्हायरल करतो, अशी धमकी दिली. फिर्यादीला राहुल शर्माला कॉल करण्यास भाग पाडून ७२ हजार रुपये पाठविण्यास भाग पाडले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोकडे तपास करीत आहेत.