बेस्ट अपघात मालिका सुरुच? कुर्ल्यानंतर सीएसएमटी परिसरात बेस्ट बसचा पुन्हा अपघात; बसखाली आल्यामुळे पादचाऱ्याचा मृत्यू

Spread the love

बेस्ट अपघात मालिका सुरुच? कुर्ल्यानंतर सीएसएमटी परिसरात बेस्ट बसचा पुन्हा अपघात; बसखाली आल्यामुळे पादचाऱ्याचा मृत्यू

योगेश पांडे/वार्ताहर 

मुंबई – कुर्ला येथे बेस्टच्या एका बसने भरधाव वेगात अनेक वाहनांना धडक देत काही पादचाऱ्यांना उडवले होते. या दुर्घटनेत सात लोकांचा मृत्यू झाला असून ४९ लोक जखमी झाले. या अपघातामुळे मुंबई हादरल्यानंतर आता पुन्हा एकदा बेस्ट बसचा अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. सीएसटीएम परिसरात ए २६ क्रमाकांच्या बसने एका व्यक्तीला चिरडले. ज्यात सदर व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात सदर अपघात घडला असून या अपघाताचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. दरम्यान कुर्ला येथे सोमवारी झालेल्या बस अपघाताची चौकशी करण्यासाठी आणि तातडीने नुकसानभरपाई देण्यासाठी बेस्ट उपक्रमाने समिती स्थापन केली आहे. त्याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांना तातडीची मदत म्हणून दोन लाख रुपये देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.

अपघातानंतर मुंबई वाहतूक पोलिसांनी एक्सवर वाहतूक वळविल्याची माहिती दिली. “बेस्ट बस अपघातामुळे वालचंद हिराचंद मार्ग जंक्शनवर (आझाद मैदान) वाहतूक संथ गतीने सुरू आहे”, अशी माहिती एक्सवर देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon