उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जुन्नर जनसन्मान यात्रेला भाजपचा विरोध? भाजप नेत्यांनी अजितदादांना दाखवले काळे झेंडे
योगेश पांडे / वार्ताहर
जुन्नर – शिरूर लोकसभा मतदार संघात यापूर्वी अजित पवार यांचे निर्विवाद वर्चस्व होते मात्र सध्या सुरू असलेल्या जनसन्मान यात्रेदरम्यान होत असलेल्या विरोधामुळे ही यात्रा वादातीत ठरते आहे. रविवारी सकाळपासून उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसमान यात्रेदरम्यान भाजपच्या जुन्नर मधील पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवून निदर्शने सुरू केली. यामुळे संपूर्ण राज्यात याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत जुन्नर तालुक्यातील नारायणगाव मध्ये असणाऱ्या एका मंगल कार्यालयामध्ये रविवारी सकाळी जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका असल्याने पर्यटन वाढी संदर्भातल्या योजनांच्या बाबतीतली बैठक होती. मात्र बैठकी आधी भाजप नेत्या जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके यांनी काळे झेंडे दाखवत निदर्शने केली. त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात महिला आणि सर्व कार्यकर्ते होते यामुळे या सभास्थळी तणाव निर्माण झाला. सुमारे दोन तास हे आंदोलन सुरू होते. महायुतीतील इतर घटक पक्षांना विचारात घेतले जात नाही असा आरोप करत हे आंदोलन सुरूच ठेवले अखेर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
आशाताई बूचके यांनी केलेल्या या कृतीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी प्रसिद्धीसाठीचा स्टंट असल्याचं म्हटलंय. जुन्नर,आंबेगाव, खेड, शिरूर या चार तालुक्यांच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरु आहे. मात्र जनसन्मान यात्रा वादात ठरताना दिसत आहे.मात्र रुपाली चाकणकर यांनी या यावर प्रतिक्रिया देताना आशा बूचके यांनी प्रसिद्धी साठी स्टंटबाजी केल्याचा आरोप केलाय. खरंतर उत्तर पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून समजला जात होता. इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही निर्विवाद होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आणि इथल्या राजकारणाला ही कलाटणी मिळाली. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला म्हणावे असे यश आले नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघात तर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा दारुण पराभव झाला.तेव्हा पासून इथलं राजकारण एक वेगळ्या वळणावर आहे. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये होत असलेल्या जनसन्मान यात्रेदरम्यान ज्या या घडामोडी होत आहेत त्यामुळे महायुतीमध्ये आलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे. एकीकडे आंबेगाव मध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाने बैठकीवर बहिष्कार घातला तर तिकडे जुन्नर मध्ये जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचकेच्या भाजपच्या पदाधिकारी आहेत त्यांनी महिलांसह मोर्चा काढून काळे झेंडे दाखवत निदर्शने केली. सगळ्या पार्श्वभूमीवर आता येत असणाऱ्या विधानसभेमध्ये ही पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये ही जनसन्मान यात्रा जाताना तिथल्या मतदारसंघांमध्ये आपल्याला कोणत्या योजना देता येतील आणि आपले मताधिक्य वाढवता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत. मात्र या जनसन्मान यात्रेदरम्यान महायुतीमध्ये एकमत होताना दिसत नाहीये.