नागपुरातील स्फोटके बनविणाऱ्या चामुंडा एक्सप्लोसिव्ह कंपनीत स्फोट; पाच जणांचा मृत्यू, तर पाच गंभीर जखमी
योगेश पांडे / वार्ताहर
नागपूर – नागपूर शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नागपूरमध्ये स्फोटक तयार करणाऱ्या एका कंपनीमध्ये भीषण अपघात झाला झाला आहे. चामुंडा एक्सप्लोसिव्ह या स्फोटके तयार कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटत आतापर्यंत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून यात चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश असल्याची माहिती आहे. तर इतर ५ कामगार गंभीररित्या जखमी झाले आहेत. तर त्यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्तही हाती आले आहे. हा स्फोट इतका भीषण होता की लगेच या कंपनीमध्ये आग लागली. त्यानंतर उपस्थितांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले. मात्र क्षणात आगीने रौद्ररूप धारण केल्याने हे प्रयत्न अपयशी ठरलेत. नागपूर शहरातील धामणा या परिसरात ही चामुंडा एक्सप्लोसिव्ह स्फोटके तयार करणारी कंपनी असून कंपनीमध्ये स्फोटक तयार केली जातात.गुरुवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास या कंपनीमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र ही घटना नेमकी कशामुळे घडली, हे अद्याप कळू शकलेले नाही.
नागपूर शहरातील धामणा या परिसरात ही चामुंडा एक्सप्लोसिव्ह स्फोटके तयार करणारी ही कंपनी आहे. गुरूवारी १३ जूनच्या दुपारच्या सुमारास स्फोट झाल्याची घटना घडली. हा स्फोट झाला त्यावेळी या कंपनीमध्ये १० ते १२ कामगार काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की यात पाच कामगारांचा जागीच मृत्यू झालाय. तर इतर पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती माहिती पुढे आली आहे. तर मृतकांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सध्या सुरू आहे.