लोणावळ्यात पॉर्न व्हिडिओचे शुटिंग, १३ जण पोलिसांच्या ताब्यात

Spread the love

लोणावळ्यात पॉर्न व्हिडिओचे शुटिंग, १३ जण पोलिसांच्या ताब्यात

पोलीस महानगर नेटवर्क

लोणावळा – पॉर्न व्हिडिओ तयार करणाऱ्या टोळीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. लोणवळ्यातील एका बंगल्यावर हा गोरख धंदा सुरू असल्याचं कळताच पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. लोणावळ्यातील आर्णव व्हील या बंगल्यात हा प्रकार सुरु होता. पोलिसांनी पॉर्न शूट करण्यासाठी लागणारा कॅमेरा आणि इतर साहित्य जप्त केलं आहे. त्यांच्याकडून शूट करण्यात आलेले काही पॉर्न व्हिडिओ ही जप्त केले आहेत. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी १३ जणांना अटक केली आहे. भारतातील वेगवेगळ्या राज्यातून हे सर्व तरुण लोणावळ्यात एकत्र आले होते. भारतात पॉर्न व्हिडिओ बनवणे कायद्याने गुन्हा आहे. असे व्हिडिओ बनवणे बंदी आहे.या सर्व आरोपीविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात भादवि. कलम २९२,२९३,३४. माहीती तंत्रज्ञान अधिनियम २००८ कायदा कलम ६७,६७ (A), स्त्रियांचे असभ्य प्रतिरुपन अधिनियम १९८६ कायदा कलम ३,४,६,७.अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी लोणावळा ग्रामीणचे पोलीस उप निरीक्षक भारत भोसले यांनी सरकारी फिर्याद दिली आहे. यानुसार विश्णु मुन्नासाहब साओ (वय-३०, रा.१६ परगना, कोलकत्ता), जावेद हबीबुल्ला खान (वय-३५, रा. आहरा उमरी, जि. बस्ती, उत्तरप्रदेश), अलका राज के राजन (वय २३, रा. आरपी, साउथ वेस्ट दिल्ली), नेहा सोमपाल वर्मा (वय ३८, रा. गणेशपुरी, मुजफानगर, उत्तरप्रदेश), रिया वासु गुप्ता (वय २१, रा. लक्ष्मीनगर, शखरपुर, दिल्ली), बुध्दसेन बरदानीलाल श्रीवास (वय-२९, रा. महाकाली कॉलनी, चंद्रपुर), समीर मेहताब आलम (वय २६, रा. अमरोहा, राईड मॉक्सी, उत्तरप्रदेश), अनुप मिथीलेष चौबे (वय २९, रा. काशीबाई चाळ कांदिवली ईस्ट, मुंबई), रामकुमार श्रीभगवान यादव (वय २१, रा. रोनक सिटी, शाम कॉलनी, हरियाणा), विना भारत पोवळे (वय ३२, रा. केंगार चाळ, खोपट, ठाणे), मैनाज जाहीद हुसेन खान (वय २८, रा. सनसिटी, नालासोपारा वेस्ट, जि. पालघर), राहुल सुरेश नेवरेकर (वय ३८, रा. मोहनचाळ, वागळे इस्टेट, ठाणे), अनिकेत पवन शर्मा (वय १९, व्यवसाय मेकअप आर्टीस्ट, रा. रूद्राक्ष रेसिडेन्सी, पलसाना, सुरत, राज्य गुजरात), वंशज सचीन वर्मा (वय २१, रा. डेहराखास, डेहराडुन), मनीश हिरामण चौधरी (वय २०, रा. शास्त्रीनगर, हरीयाणा) यांच्यासह बंगला चालक सुखदेव चांगदेव जाधव (वय ५२, रा. मळवली, ता. मावळ), आकेष गौतम शिंदे (वय ३२, रा. मळवली, ता. मावळ) व सनी विलास शेंडगे (वय ३५, रा. मळवली, ता. मावळ, जि.पुणे) यांच्या विरोधात सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या अश्लील ओ.टी.टी प्लॅटफॉर्मसाठी काही तरुण आणि तरुणी लोणावळ्यातील व्हीलावर पॉर्न व्हिडिओ तयार करत होते. भारता पॉर्न व्हिडिओ करण्यावर बंदी असताना १५ जण लोणावळ्यात बिनधास्त पॉर्न व्हिडिओ तयार करत होते. काही व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी पॉर्न व्हिडिओ शूट करण्यासाठी लागणारे कॅमेरे आणि इतर साहित्य जप्त केले आहे.

२९ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या पूर्वी पाटण गावच्या हद्दीत असलेल्या आर्णव व्हीला या बंगल्यात अश्लील चित्रीकरण सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या पथकाने केली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon