धक्कादायक ! वाशीमधील कार्यक्रमात ‘एबीपी माझा’ च्या पत्रकारावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
नवी मुंबई – वाशी एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अल्पसंख्याक विश्वास मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याची बातमी घेण्यासाठी विविध मराठी वृत्त वाहिन्याचे पत्रकार उपस्थित होते. यामध्ये एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीचे कॅमेरामन सचिन शिंदे यांनी प्रतिक्रिया घेण्यासाठी अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी असलेल्या प्रवेशद्वाराजवळ महिला पत्रकाराला धक्का मारत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आलेय. पीडित महिला पत्रकारासह इतर महिला तसेच पुरुष पत्रकारांनी सचिन शिंदे यास समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने अश्लील भाषेत शिवीगाळ करून सर्व स्थानिक पत्रकारांना अपमानित केले. जे काय करायचे ते करा आम्ही कुणाला घाबरत नाही, तुम्ही मोबाईल रिपोर्टर म्हणत स्थानिक पत्रकारांना तुच्छ लेखण्याचा प्रयत्न केला.
पीडित महिलेसह सर्व स्थानिक पत्रकारांना आपला अपमान आणि सदर महिला पत्रकारास आपला झालेला विनयभंग सहन न झाल्याने तिने थेट पोलीस ठाणे गाठून एबीपी माझाचा मुजोर कॅमेरामन सचिन शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वाशी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.