ऑनलाईन लुटमार करणाऱ्या भाऊ- बहिणीला अटक; ४८ चेकबुक, एटिएम कार्ड जप्त

Spread the love

ऑनलाईन लुटमार करणाऱ्या भाऊ- बहिणीला अटक; ४८ चेकबुक, एटिएम कार्ड जप्त

जळगाव – शहरातील एका तरुणाला २७ डिसेंबर ते १० जानेवारी या कालावधीत सोशल मीडिया व व्हॉटसऍप क्रमांकावरुन संपर्क व मेसेज चॅटींग करुन रसायन खरेदी विक्रीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखविले.  झटपट पैसा दुप्पट करण्याच्या योजनेतून तक्रारदाराचा भरवसा जिंकत ५ लाख ६४ हजारांचा ऑनलाईन गंडा घातल्या प्रकरणी सायबर ठाण्यात गुन्हा दाखल होता. या दाखल गुन्ह्यात सायबर पोलिसांनी भिलवाडा (राजस्थान) येथून संशयित भाऊ-बहिणीच्या जोडीला अटक केले आहे

जळगाव सायबर ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या पथकाने गुन्हा घडल्यापासून तपास सुरु केला. संबधीत बँक व मोबाईल कंपनी यांचेकडे पोलिसांनी पत्रव्यवहार करुन माहीती प्राप्त केली. माहितीच्या आधारे संशयित सायबर गुन्हेगार चंदाकुमारी उर्फ तानिया सत्यनारायण शर्मा (वय ३०) व भरत सत्यनारायण शर्मा (वय२७, रा. भिलवाडा, राजस्थान) या दोघांना राजस्थान राज्यातील भिलवाडा येथील असल्याचे निष्पन्न झाले. जळगाव पोलिसांच्या पथकाने राजस्थानातील भिलवाडा येथे शास्त्रीनगर येथून अटक केली. अटकेतील दॊघेही भाऊ- बहिण असून त्याच्या ताब्यातून ४८ वेगवेगळ्या बँकेचे चेकबुक, २० वेगवेगळ्या बँकेचे एटीएम कार्ड, वेगवेगळ्या कंपनीचे २ मोबाईल फोन, ५ सिमकार्ड असे पुरावे आणि दस्तऐवज पोलिस पथकाने जप्त केले आहे. संशयितांना जिल्‍हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांची ५ दिवसांच्या कोठडीत रवानगी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon