मुंबईत कोट्यावधी किंमतीचा गुटखा पोलिसांकडून जप्त
मुंबई – परिसरातून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुटखा विक्री व साठवणुक करणाऱ्या तिघांना जेरबंद केले आहे, यामध्ये इब्राहिम मैनुद्दीन इनामदार, संतोष कुमार रामसीहासन सिंग व कलिम वाहिद हसन खान अशी जेरबंद करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
गुन्हे शाखा कक्ष-९ पोलिसांनी दादाभाई नौरोजी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ७८,१२००/- रु.किमतीचा अवैध गुटखा व त्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेला ट्रक देखील जप्त करण्यात आला असून ट्रक चालकास अटक करण्यात आली आहे. त्याची सखोल चौकशी केली असता कांदिवली परिसरात पार्क करण्यात आलेल्या एका टेम्पोमधून २८,१७,६००/-रु. किमतीचा गुटखा व वापरण्यात आलेला टेम्पो देखील जप्त करून दोघांना अटक करण्यात आली.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत १,६,१८,८००/- रु.किमतीचा प्रतिबंधित गुटखा व ३३,००,०००/- रु.किमतीची दोन वाहने असा एकूण १,३९,१८,८००/- रु.किमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर गुटखा कुठून व कसा आला याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.