हळदीच्या कार्यक्रमात राडा, नवरदेव गंभीर जखमी, तिघांना अटक

Spread the love

हळदीच्या कार्यक्रमात राडा, नवरदेव गंभीर जखमी, तिघांना अटक

पुणे – हळदी समारंभ झाल्यानंतर जेवणाच्या पंगतीमधून तिघेजण ये जा करीत होते. त्यांना मनाई केली असता त्या तिघांनी बाचाबाची करून नंतर एकावर कोयत्याने वार केले. तसेच हळदी समारंभात आलेल्या लोकांसमोर कोयत्याच्या धाकाने दहशत पसरवली. ही घटना जय भवानी चौक, श्रीनगर रहाटणी येथे घडली. विजय राहुल तलवारे (वय २२, रा. काळेवाडी) सनी राजीव गायकवाड (वय २३,रा. पिंपरी), अनिकेत बापू बनसोडे (वय २४, रा. पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.याप्रकरणी रोहित प्रकाश गायकवाड (वय २९, रा. श्रीनगर, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहित गायकवाड यांचा हळदी समारंभ शुक्रवारी सायंकाळी होता. हळदी समारंभ झाल्यानंतर पाहुणे मंडळी जेवण करण्यासाठी बसले. त्यावेळी आरोपी तिघेजण पंगतीमधून सतत येजा करीत होते. त्यामुळे रोहित यांनी त्या तिघांना पंगतीमधून ये जा करण्यास मनाई केली. त्याचा त्यांना राग आला. सुरुवातीला तिघांनी रोहित यांच्याशी बाचाबाची केली. काही वेळाने आरोपी कोयता आणि रॉड घेऊन आले. विजय तलवारे याने रोहित यांचा मामे भाऊ शक्ती बनसोडे याच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रोहित यांनी शक्ती यांना ढकलले. दरम्यान, कोयत्याचा वार रोहित यांच्या हातावर झाला. रोहित या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी कोयता आणि रॉड हवेत फिरवून ‘आम्ही इथले भाई आहोत. आमच्या नादाला लागले तर तुमची विकेट काढीन’ अशी धमकी देत दहशत निर्माण केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon