खंडणीच्या गुन्ह्यात भाजपचा युवा नगरसेवक हितेश कुंभार व राकेश कुंभकर्ण पोलिसांकडून अटक
भिवंडी – मुंबईतील नगरसेवक असल्याची बतावणी करून अकोले येथील भाजपचा युवा नगरसेवक हितेश कुंभार व राकेश कुंभकर्ण खंडणी स्वीकारताना कोनगाव पोलिसांनी अटक केली आहे. तुम्हाला डान्स बार व ऑर्केस्ट्रा चालवायचा असेल तर आम्हाला ५ लाखांची खंडणी द्यावी लागेल अशी धमकी सातत्याने बारमालकांना देत असे.
काही दिवसांपूर्वीअकोले येथे राहणारे भाजप नगरसेवक हितेश कुंभार याने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेऊन भिवंडी, ठाणे, मुंबई, नविमुंबई परिसरात मोठया प्रमाणात डान्सबार चालू असल्याचे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती, याचाच आधार घेऊन हे दोघेजण बारमालकांना धमकावत होते, शेवटी यांच्या त्रासाला कंटाळून लैला बार व इतर बार मालकांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली.त्यानुसार २७ हजारांची रोख रक्कम स्वीकारताना कोनगाव पोलिसांनी दोघांना रंगेहाथ पकडले.या प्रकरणी कोनगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.