शिंदवणेत अवैध दारू अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा; दोन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

Spread the love

शिंदवणेत अवैध दारू अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा; दोन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीतील काळे शिवार परिसरात अवैध दारू तयार करण्याच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे भरारी पथक क्र २ ने छापा टाकला. या छाप्यात सुमारे दोन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. या कारवाईत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या पाश्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क हवेली तालुक्यात गस्त घालत होते. गस्त घालत असताना पोलिसांना एका खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीतील काळे शिवार परिसरात अवैध गावठी हातभट्टी दारू तयार करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्वरित घटनास्थळी जाऊन अचानक छापा टाकला.

या छाप्यात पोलिसांनी ४५००लिटर कच्चे रसायन व ३५० लिटर दारू असा सुमारे १ लाख ९५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला आहे. तर दोन अज्ञात इसमांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक ए. बी. शितोळे दुय्यम निरीक्षक आर डी. भोमले जवान के. आर. पावडे, के. एस. मुस्लापूरे, वाहन चाल‌क ए. आर सिसोलेकर यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon