डोंबिवलीजवळ सोमवारी धावत्या लोकलमधून पडून २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू

Spread the love

डोंबिवलीजवळ सोमवारी धावत्या लोकलमधून पडून २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू

योगेश पांडे / वार्ताहर

डोंबिवली – धावत्या लोकलमधून पडून एका २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना डोंबिवली कोपर स्थानकाजवळ सोमवारी २९ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास घडली.रिया श्यामजी राजगोर असे या तरुणीचं नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणी डोंबिवली पूर्व येथे आपल्या कुटुंबासह राहत होती. आई-वडील आणि भाऊ असा तरुणीचा परिवार होता. रिया ठाण्यातील एका कन्स्ट्रक्शन कार्यालयात कार्यरत होती. दररोज ती ठरल्याप्रमाणे मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल पकडून ठाण्यात जायची.सोमवारी सकाळी ठरल्याप्रमाणे तिने डोंबिवली रेल्वे स्थानकावरून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल पकडली.

लोकलच्या आत शिरण्याचा प्रयत्न करत होती मात्र लोकलमधील गर्दीमुळे ती दरवाजाजवळच थांबली. मात्र गर्दीमुळे डोंबिवली ते कोपर स्थानकादरम्यान तिचा तोल गेल्या. तोल गेल्यानंतर लोकल खाली पडून तिचा दुर्देवी मृत्यू झाला. तात्काळ प्रवाशांनी या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. या आधी देखील अनेक प्रवासी डोंबिवली ते कोपर दरम्यान गर्दीचा बळी ठरलेत. त्यामुळे रेल्वे या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रवाशांकडून अनेकदा डोंबिवलीहून सोडण्यात येणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये वाढ करण्याची मागणी केली जाते.मात्र अद्याप ही ही मागणी पूर्ण झालेली नाही त्यामुळे लोकल सेवा कधी वाढवणार असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon