पाकिस्तानातून मुंबईत ३५० किलो आरडीएक्स||मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात धमकीचा फोन

Spread the love

पाकिस्तानातून मुंबईत ३५० किलो आरडीएक्स||मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात धमकीचा फोन

मुंबई विमानतळ, महालक्ष्मी, ट्रॉमा यासह अनेक संवेदनशील ठिकाणे केंद्र स्थानी, रेल्वे पोलिसांनी प्रत्येक रेल्वे स्थानकात गस्ती पथक वाढवले.

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – सध्या देशात लोकसभा निवडणूक सुरू असून, राज्यात चार टप्प्यातील निवडणुका पार पडल्या आहेत. तर, मुंबईतील नाशिक, ठाणे, धुळे या जिल्ह्यातील पाचव्या टप्प्यातील निवडणुका पार पडणार आहेत. असे चित्र असताना मुंबई नियंत्रण कक्षाला पाकिस्तानातून ३५० किलोचे आरडीएक्स मुंबईत येणार आहे. रेल्वे स्थानक, मुंबई विमानतळ, महालक्ष्मी, ट्रॉमा यासह अनेक संवेदनशील ठिकाणे केंद्र स्थानी असणार आहेत. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी प्रत्येक रेल्वे स्थानकात गस्ती पथक वाढवले आहे.

मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघासह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळे या मतदार संघात २० मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर घातपात होण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. नुकताच मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाने वाडीबंदर येथील रेल्वे पोलिसांच्या नियंक्षण कक्षाला कळविले की, अस्लम अली हा कराची, पाकिस्तान येथून मुंबईला ३५० किलो आर.डी.एक्स घेऊन आला असून महालक्ष्मी, ट्राॅमा, विमानतळ आणि इतर रेल्वे स्थानकात ठेवणार आहे. या धमकीच्या दूरध्वनी नंतर रेल्वे स्थानक आणि परिसरात सतर्कता बाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत पत्र काढून प्रत्येक रेल्वे पोलीस ठाण्यात गस्ती वाढवण्याचे, रेल्वे सुरक्षा बलाची मदत घेऊन, पहारा वाढवण्याचे आदेश रेल्वे पोलिसांना दिले आहेत.गोपनीय यंत्रणा सतर्क करून, रेल्वे सुरक्षा बल व स्थानिक पोलिसांशी सतत संपर्क साधून समन्वय ठेवणे सुरू केले आहे. तसेच दंगल नियंत्रक पथक, शीघ्र प्रतिसाद पथक रेल्वे स्थानकात नेमण्यात येणार आहेत. गर्दीमधील संशंयित प्रवाशांवर बारकाईने लक्ष ठेवणे, मनुष्यबळ वाढवण्याच्या सूचना रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेवरील सीएसएमटी, भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, कल्याण; पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, वांद्रे, अंधेरी, सांताक्रूझ, बोरिवली येथे पोलिसांचा पहारा वाढला आहे. कोणताही घातपात होऊ नये, अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वारंवार पाहणी दौरा घेतला जात आहे. तसेच रेल्वे स्थानकावर श्वान पथक यांच्याद्वारे रेल्वे परिसरातील अडगळीच्या जागा, कचऱ्याचे डबे, प्रवाशांचे सामान यांची तपासणी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon