एटीएम कार्डची चोरी करुन पैसे काढणाऱ्या ३ आरोपींना गुजरात राज्यातुन अटक

Spread the love

एटीएम कार्डची चोरी करुन पैसे काढणाऱ्या ३ आरोपींना गुजरात राज्यातुन अटक

गुन्हे शाखा कक्ष-१, काशिमीरा पोलिसांची दमदार कामगिरी

पोलीस महानगर नेटवर्क

भाईंदर – पैसे काढण्यासाठी एटीएम कार्डचा वापर करीत असताना कार्ड मशीनमध्ये अडकल्याने हतबल झालेल्या इसमाचा तिथे उपस्थित असलेल्या अनोळखी व्यक्तीने फायदा घेत एटीएम कार्ड काढून फसवणूक केली. सदर घटना दि. १७ एप्रिल, २०२४ रोजी संध्याकाळी १७.१० वा च्या सुमारास भाईदर पूर्व, बंदरवाडी जवळ, लक्ष्मी टॉवर, नवघर रोड, याठिकाणी असलेल्या एच.डी.एफ.सी. बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये घडली.

अनिल लक्ष्मण जाधव (वय ५९ वर्षे, रा- सी/२११, भालचंद्र कॉम्प्लेक्स, सुदर्शन लेन, नवघर रोड, भाईदर पूर्व) हे त्यांच्या खात्याचे मिनी स्टेटमेट काढण्याकरीता गेले असता त्याचे

एटीएम कार्ड हे मशिन मध्ये अडकले ते काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न करुन देखील निघाले नाही. सदर वेळी एटीएम सेंटर मध्ये एक अनोळखी इसम आला व त्याने फिर्यादी यांना एटीएम चा पिन टाकण्यास सांगितले व फिर्यादी यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवुन पिन नंबर टाकुन कॅन्सल बटन दाबले परंतु एटीएम कार्ड बाहेर आले नाही. त्यानंतर फिर्यादी यांनी त्याचे एटीएम कार्ड ब्लॉक करण्याकरीता फोन करत तसेच मित्रांना फोन करीत एटीएम च्या बाहेर आल्या नंतर सदर अज्ञात इसमाने त्याचे एटीएम कार्ड चोरी केले व त्याद्वारे वेगवेगळया एटीएम मधुन एकुण ५०,०००/- रुपये फिर्यादी यांच्या खात्यातुन चोरी केले.

अनिल लक्ष्मण जाधव यांच्या फिर्यादीवरुन नवघर पोलीस ठाण्यात गु.रजि. नं. २३९/२०२४ भा.दं.वि.सं. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर गुन्हयाचा तपास वरिष्ठांच्या आदेशा प्रमाणे गुन्हे शाखा कक्ष-०१ काशिमीरा मार्फत समांतर तपास करण्यात आला असता सदर गुन्हयांच्या घटनास्थळावरुन मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाव्दारे यातील आरोपी निष्पन्न करुन ते वापी राज्य गुजरात याठिकाणी वास्तव्यास असल्याची माहीती गुप्त बातमीदार याच्या मार्फत मिळाली. वरिष्ठांच्या परवानगीने वापी याठिकाणी पथक रवाना करुन आरोपी १) शिवशंकर रामु प्रसाद वय २५ वर्षे, धंदा-मजुरी, रा. गाव झोझुरी, तालुका- बरखटटा राज्य-झारखंड २) प्रिन्स विनोद जयस्वाल वय २८ वर्षे, धंदा-चालक, रा- रुम नं २०१, सोमा रेसिडन्सी, वापी, जि-वलसाड, राज्य गुजरात, कायमचा पत्ता- गाव-पांडेचा चौराहा, ता-रामपुर कारखाना, जि-देवाडीया, उत्तर प्रदेश ३) उपेद्र सिंग रामप्रवेश सिंग वय ४५ वर्षे, धंदा मजुरी, रा. रुम नं ए/४३९ रा. सोसायटी, ता-पलसाना, जि-सुरत यांना गुंजन चौफुला, वापी, राज्य गुजरात या ठिकाणाहुन ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीकडे केलेल्या चौकशीत त्यांनी नवघर पोलीस ठाणे, मिरारोड, वसई, विरार, मालाड, कांदीवली, बोरीवली, माहीम, जोगेश्वरी, अंधेरी यााठिकाणी देखील अशाच प्रकारे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीवर पुढील कारवाईसाठी नवघर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी अविनाश अंबुरे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, मदन बल्लाळ, सहा. पोलीस आयुक्त साो, गुन्हे शाखा, यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शाखा कक्ष १ काशिमीरा येथील पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सपोनिरी प्रशांत गांगुर्डे, सपोनिरी पुष्पराज सुर्वे, पोलीस हवालदार संतोष लांडगे, सचिन हुले, विजय गायकवाड, समिर यादव, सुधीर खोत, सतोष चव्हाण सायबर विभाग यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास नवघर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon