डीआरआयकडून सोन्याची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटचा पर्दाफाश ; जप्त केलं १६ किलो सोनं

Spread the love

डीआरआयकडून सोन्याची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटचा पर्दाफाश ; जप्त केलं १६ किलो सोनं

मुंबई – महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) सोन्याची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटचा पर्दाफाश करत १६ किलो सोने आणि रु. २.६५ कोटी रोख जप्त केली आहे. दुबईतून सोन्याची तस्करी करून भारतात विकणाऱ्या टोळीच्या पाच सदस्यांना अटक करण्यात महसूल गुप्तवार्ता संचालनालयाला (डीआरआय) यश आले आहे. याप्रकरणी झवेरी बाजार, वर्सोवा व मुंबादेवी परिसरात डीआरआयने छापे टाकून १४ किलो ४९७ ग्रॅम सोने, दोन कोटी रुपयांची रोख व ४६०० पाऊंड जप्त केले आहेत.

सोन्याची तस्करी करणाऱ्या या टोळीला दोन ते तीन हजार रुपये प्रतिकिलो कमिशन मिळायचं. या गुन्ह्यात एक महिला सहभागी होती. दुबईतील मुख्य आरोपीची माहिती सुद्धा डीआरआयला मिळाली. भारतात सोन आणून त्याची कमी दरात विक्री करायचे. डीआरआयला याची माहिती मिळाली होती. त्यांनी सापळा रचून कारवाई केली. महेंद्र जैन, मोहम्मद रफीक रझवी व समीर मर्चंट ऊर्फ अफजल हारून बटाटावाला, उमेद सिंह, महिपाल व्यास अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon