जामखेडमध्ये मुकादम यास गोळ्या घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ; आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Spread the love

जामखेडमध्ये मुकादम यास गोळ्या घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ; आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

पोलीस महानगर नेटवर्क

नगर – जामखेड येथील गोळीबार प्रकरणी आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे (रा. पाटोदा, ता. जामखेड) व कुणाल जया पवार (रा. कान्होपात्रा, नगर, ता. जामखेड) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. ३ मार्च, २०२४ रोजी फिर्यादी श्री. आबेद बाबुलाल पठाण, (४०), रा. भवरवाडी, ता. जामखेड हे लेबर मुकादम असुन त्यांचेकडील मजुर लक्ष्मण कल्याण काळे रा. जामखेड यास अक्षय ऊर्फ चिंग्या मोरे याने दिड वर्षापुर्वी मारहाण केल्याने त्याचे विरुध्द जामखेड पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती. त्याचा राग मनात धरुन आरोपी अक्षय ऊर्फ चिंग्या मोरे याने त्याचे साथीदारासह येवून फिर्यादीस शिवीगाळ करुन, जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्टलने गोळ्या झाडल्याने फिर्यादीचे उजव्या पायाचे पोटरीला दुखापत केली. याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गु.र.नं. १०१/२०२४ भा.द.वि. कलम ३०७, ५०४, ३४ सह शस्त्र अधिनियम ३/२५ प्रमाणे खुनाचा प्रयत्न अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमून गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्याच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव व अंमलदार बापुसाहेब फोलाणे, रविंद्र कर्डीले, विश्वास बेरड, विशाल दळवी, रोहित मिसाळ, बबन मखरे, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, प्रमोद जाधव, मेघराज कोल्हे, रणजीत जाधव, प्रशांत राठोड, उमाकांत गावडे व भरत बुधवंत यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon