बातमी लावणाऱ्या पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी; भाजपच्या ३ नेत्यांवर गुन्हा दाखल

Spread the love

बातमी लावणाऱ्या पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी; भाजपच्या ३ नेत्यांवर गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे – देशभरात लोकसभा निवडणुकीची धुमधाम सुरू असताना महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. एकीकडे देशभरात लोकशाहीचा उत्सव केला जात आहे. तर दुसरीकडे देशासह राज्यात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांवर निर्बंध येत आहेत असेच काही प्रकार घडत आहेत त्यामुळे लोकशाहीवर प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यात नेत्यांकडून धमक्या मिळण्याचं सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरूच आहे. अशात आणखी एक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला आहे.

पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी

आमच्या विरोधात बातमी का लावलीस? असे म्हणत ‘महाराष्ट्र देशा’ या नामांकित न्यूज पोर्टलच्या पत्रकारास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भाजपच्या तीन नेत्यांवर पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जनतेचा कौल लक्षात घेऊन १२ मे २०२४ रोजी महाराष्ट्र देशा या वेब न्यूज पोर्टलवर ‘संदीपान भुमरेंना मोठा झटका? जलील निवडून येणार असेल तर खैरेंना मदत?’ या आशयाखाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर महायुतीमध्ये खळबळ माजली होती.

भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, भाजपा अनुसूचित मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस जालिंदर शेंडगे, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मकरिये आदींनी फोनकरून आमच्या विरोधात बातमी लावतो का? असं म्हणत ‘महाराष्ट्र देशा’च्या पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिली. यामागे मोठे षडयंत्र असल्याचे पत्रकारांनी सांगितलं आहे.

भाजपच्या ३ नेत्यांवर गुन्हा दाखल

सदरिल व्यक्तीपासून माझ्या जीवितास धोका आहे, अशी तक्रार पत्रकाराने पुणे येथील हिंजवडी पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड मध्ये भादंवी कलम ५०७ प्रमाणे वरती नमूद तिन्ही नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोग, दिल्ली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषद, विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार यांच्याकडेही पाठविण्यात आले आहे.

कारवाई न केल्यास पत्रकार आक्रमक होणार

राज्यात याआधीही पत्रकारांवर जीवघेणा हल्ला करण्याचे प्रकार घडले आहेत, त्यामुळे पत्रकारांचं संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्रात ‘पत्रकार सुरक्षा कायदा’ लागू करण्यात आला, त्यानंतरही पत्रकारांना अशाप्रकारे जीवे मारण्याची धमकी देण्याचे प्रकार घडत आहेत. या प्रकारामुळे राज्यातील पत्रकारांमध्ये संतापाचं वातावरण आहे. सदर प्रकरणातील नेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे, अन्यथा राज्यभरातील पत्रकार आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon