यवतमाळची ‘बबली’ मीरा फडणीस पोलिसांच्या जाळ्यात ; मोदी, शहांच्या नावाखाली घातला होता ८ कोटींचा गंडा

Spread the love

यवतमाळची ‘बबली’ मीरा फडणीस पोलिसांच्या जाळ्यात ; मोदी, शहांच्या नावाखाली घातला होता ८ कोटींचा गंडा

पोलीस महानगर नेटवर्क

यवतमाळ – केंद्र शासनाच्या पर्यटन विभागातील विविध योजनांमध्ये चांगली संधी उपलब्ध असल्याचे सांगून अनेकांची फसवणूक करणाऱ्या महाठग मीरा प्रकाश फडणीस या महिलेला अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. यवतमाळआर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. यात उत्तर प्रदेशातील एका साथीदाराला सोबत घेऊन या महिलेने ६ जणांची ४७ लाख रूपयाने फसवणूक केली होती. या प्रकरणी अवधुतवाडी पोलीस ठाण्यात १० ऑगस्ट २०२३ मध्ये सचिन धकाते यांनी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी अनिरूध्द आनंदकुमार होशींग (रा.वाराणसी) याला अटक करण्यात आली होती. तर तेव्हापासून मीरा फडणीस फरार झाली होती.

सचिन अनील धकाते यांच्या तक्रारीनुसार, धकाते यांचा मंगल कार्यालय व चित्रपट निर्मितीचा व्यवसाय असून, ते मीरा फडणीस या महिलेला पाच वर्षांपासून ओळखतात. त्यांचा मित्र चेतन भिसे हा देखील महिलेच्या संपर्कात होता. त्यांचे कधीकधी फोनवर बोलणे व्हायचे. दरम्यान, फडणीस हिने आपली पर्यटन मंत्रालयाच्या निर्देश सल्लागार समितीत सदस्य म्हणून निवड झाल्याचे सांगितले. आपल्यासोबत पर्यटन विभागातील अधिकारी अनिरुद्ध होशिंग काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. पर्यटन मंत्रालयाच्या खूप योजना असून, त्यात गुंतवणूक केल्यास आर्थिक फायदा होत असल्याचे वारंवार बिंबविले. होशींगसोबतची छायाचित्रे दाखवून फडणीस हिने विश्वास संपादन करीत सहा जणांची ४७ लाखांनी फसवणूक केली.

मीरा फडणीस या यवतमाळच्या बबली ने अनेकांना गंडा घातल्याचे बोलले जात असून ही रक्कम ८ कोटींचा घरात जाईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मीरा फडणीस हिला अटक करण्यात आली असून याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon