जीएसटी अधिकारी असल्याची बतावणी करत व्यापाऱ्याला लुटले; मार्केट यार्डमधील घटना

Spread the love

जीएसटी अधिकारी असल्याची बतावणी करत व्यापाऱ्याला लुटले; मार्केट यार्डमधील घटना

पुणे – वस्तू आणि सेवा कर कार्यालयातील अधिकारी असल्याची बतावणी करुन एका व्यापाऱ्याला लुटल्याची घटना पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केट यार्ड मधील भुसारा बाजारात घडली आहे. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी सहा अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. महेश तोतामल दर्याणी (वय ५२, रा. रोस परेड सोसायटी, एनआयबीएम, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.

महेश दर्याणी हे सुपारीचे व्यापारी आहेत. त्यांचे मार्केट यार्ड येथील भुसार बाजारात ओम ट्रेडिंग कंपनी नावाची फर्म आहे. ८ फेब्रुवारी रोजी त्यांच्या दुकानात सहा जण आले. त्यामध्ये दोन महिला देखील होत्या. सर्व आरोपींच्या गळ्यात ओळखपत्र होते. अंगावर सफारी आणि सरकारी अधिकारी करतात तसा पेहराव होता. या सर्वांनी जीएसटी कार्यालयातील अधिकारी असल्याची बतावणी केली. यावेळी या तोतया अधिकाऱ्यांनी दुकानांमध्ये मालाची आणि बिलांचे रेकॉर्ड मागवत मालाचा व्हिडिओ काढून चेकिंगच्या नावाखाली दबाव टाकला. तसेच तब्बल दोन लाख रुपये लंपास केले. तपासणीच्या नावाखाली व्यापाऱ्याला तोतया जीएसटी अधिकाऱ्यांनी लुटल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मार्केट यार्डातील भुसार बाजारात घबराट उडाली. अखेर गुरूवारी (ता. २९) व्यापाऱ्याने संबंधित घटनेची पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले असून, सहायक पोलिस निरीक्षक चव्हाण पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon