कल्याण रेल्वे स्थानकात ८ प्रवाशांचे मोबाईल चोरणारा भुरटा अटकेत

Spread the love

कल्याण रेल्वे स्थानकात ८ प्रवाशांचे मोबाईल चोरणारा भुरटा अटकेत

गुन्हे शाखा युनिट -३ ची दमदार कारवाई

प्रकाश संकपाळ

कल्याण – मध्य रेल्वे मार्गावरील जंक्शन व लोकल,मेल,एक्सप्रेस गाड्यांमधील प्रवाशांचे सर्वाधिक गर्दी असलेल्या कल्याण स्थानक ८ प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात आले आहे. ही कारवाई मुंबई लोहमार्ग गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने केली. कल्याणच्या फलाट क्रमांक १ वर लोकलच्या सामान्य डब्यात चढत असताना एका प्रवाशाच्या खिशातील मोबाईल भुरट्या चोराने पळवला. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू असताना ज्या दिवशी मोबाईल चोरीला गेल्या त्यावेळेस एक जण रेल्वे स्थानकामध्ये संशयास्पदरित्या फिरताना दिसून आला. त्यानुसार तपास केला त्याचे नाव सलमान मोहम्मद अली अन्सारी (वय २१ वर्षे, रा. भिवंडी, जि.ठाणे) असून तो सध्या आधारवाडी कारागृहात न्यायालयीन कोठडीत असल्याचे समजले. त्या माहितीच्या आधारे त्याला ताब्यात घेण्यात आले असता सलमानला न्यायालयात हजर करून रिमांड मिळवण्यात आला. चौकशीदरम्यान त्याने आतापर्यंत केलेल्या गुन्ह्यांची माहिती दिली. त्याच्याकडून १ लाख ७७ हजार ९८९ रुपयांचे महागडे मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले.

आरोपीची अधिक।चौकशी केली असता कल्याण रेल्वे पोलीस गु.र.न. ११६/२०२४ कलम ३७९, ३४ भा.दं. वि., कल्याण रेल्वे पोलीस गु.र.न. १११/२०२४ कलम ३७९ भा.दं. वि., कल्याण रेल्वे पोलीस गु.र.नं. ३५६/२०२४ कलम ३७९, ३४ भा.दं.वि.,कल्याण रेल्वे पोलीस गु.र.न. १४७/२०२४ कलम ३७९, ३४ भा.दं. वि., कल्याण रेल्वे पोलीस गु.र.न. ४०३/२०२४ कलम ३७९, ३४ भा.दं. वि., कल्याण रेल्वे पोलीस गु.र.न. ४०४/२०२४ कलम ३७९, ३४ भा.दं.वि.,कल्याण रेल्वे पोलीस गु.र.न. ४०६/२०२४ कलम ३७९, ३४ भा.दं. वि.व कल्याण गु.र.नं. ४०७/२०२४ कलम ३७९, ३४ भा.दं.वि. प्रमाणे असून असे एकूण ८ गुन्हे दाखल असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली. सदर आरोपीबाबत आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, मध्य लोहमार्ग परिमंडळचे उपायुक्त मनोज पाटील, एसीपी राजेंद्र रानमाळे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शन पोउपनिर प्रकाश चौगुले, अंमलदार राजेंद्र दिवटे, जनार्दन पुलेकर, अजय रौंधळ, रविंद्र दरेकर, वैभव जाधव, सौ.स्मीता बसावे, पद्मा केंजळे, महेंद्र कर्डिले, रविंद्र ठाकुर, हितेश नाईक, अजित माने, सोनाली पाटील, गोरख सुरवसे, अक्षय चव्हाण, सुनिल मागाडे यांनी कारवाई करून चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आणले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon