जळगावमध्ये संतापजनक घटना; तरुणीवर आळीपाळीने नराधमांचा बलात्कार 

Spread the love

जळगावमध्ये संतापजनक घटना; तरुणीवर आळीपाळीने नराधमांचा बलात्कार 

जळगाव – जळगाव जिल्हा हादरवून टाकणारी संतापजनक घटना समोर आली आहे. चोपडा तालुक्यातील एका गावातील १८ वर्षीय तरुणीवर आधी एकाने व नंतर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. या प्रकरणी संशयित चार नराधमांना ताब्यात घेण्यात आले आहे. तालुक्यातील एका गावात गफूर गबू तडवी (३३) याने २ जानेवारी रोजी दुपारी तरुणीच्या घरात घुसून धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाही, तर या तरुणीला यावल तालुक्यात भेटायला ये; नाहीतर, ठार मारण्याची धमकी दिली. घाबरून ही तरुणी यावल येथे पोहोचली. त्यावेळी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी प्रतीक राजेंद्र कोळी (२०), पंकज बुधा कुंभार (२६) व अमोल शत्रुघ्न कोळी (२३) या तीन जणांनी दारूच्या नशेत तरुणीला आधी सहानुभूती दाखवली. नंतर जिवे मारण्याची धमकी देत आळीपाळीने बलात्कार केला. ४ जानेवारी रोजी रात्री १२ ते पहाटे तीन वाजेदरम्यान ही घटना घडली.

या धक्कादायक व संतापजनक घटनेनंतर तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून वरील चारही जणांविरुद्ध अडावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ४ नराधमआरोपींना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश बुवा करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon