डोंबिवलीत तडीपार गुंडाकडून दोघांना मारहाण करत लुटले

Spread the love

डोंबिवलीत तडीपार गुंडाकडून दोघांना मारहाण करत लुटले

कल्याण – कल्याण पूर्व परिसरात आडीवली येथे रिक्षाचालक व आरोपी यांच्यामध्ये वाद सुरू असताना तो सोडविण्यासाठी गेलेल्या दोन सख्या भावांना आरोपींनी मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम काढून घेऊन पसार झाले.

मारहाण झालेल्या विजय यादव यांच्या फिर्यादीवरून सोहेल बेग याच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सोहेल बेग याला अटक केली असून त्याचा साथीदार फरार असून त्याचा शोध सुरू आहे. अटक आरोपी हा तडीपार असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत असल्याचे मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी दैनिक पोलीस महानगर शी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon