निजामपुरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चैन स्नॅचिंग करणारा आरोपी २४ तासांत जेरबंद

निजामपुरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चैन स्नॅचिंग करणारा आरोपी २४ तासांत जेरबंद

पोलीस महानगर नेटवर्क

भिवंडी : गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपीला निजामपुरा पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत अटक करत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात पोलिसांना यश आले.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी व्यक्तीच्या गळ्यातील सुमारे १ तोळे वजनाची सोन्याची चैन अज्ञात आरोपीने जबरीने हिसकावून चोरी केली होती. घटनेनंतर निजामपुरा पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपीची ओळख पटवली.

त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीस अटक केली. आरोपीकडून चोरीस गेलेली सोन्याची चैन देखील हस्तगत करण्यात आली आहे. या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे नागरिकांकडून निजामपुरा पोलिसांचे कौतुक होत आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास निजामपुरा पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon