चोरीचा संशय घेतल्याच्या रागातून मित्रानेच मित्राला संपवलं; आरोपीच्या अटकेसाठी आमदार चंद्रकांत पाटलांचा पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या

चोरीचा संशय घेतल्याच्या रागातून मित्रानेच मित्राला संपवलं; आरोपीच्या अटकेसाठी आमदार चंद्रकांत पाटलांचा पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या

योगेश पांडे / वार्ताहर

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील बोदवड शहरात धक्कादायक घटना घडली आहे. घरी झालेल्या चोरीचा संशय मित्रावर व्यक्त केल्याच्या रागातून मित्रानेच मित्राची भोसकून हत्या केल्याची घटना बोदवड शहरात घडली आहे. या घटनेतील आरोपीला अटक व्हावी, या मागणीसाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह मयताच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन सुरु केलं.

बोदवड शहरात राहणारे मयत अन्सार पिंजारी यांच्या घरात काही दिवसापूर्वी चोरी झाली होती. या चोरी संदर्भात त्यांनी त्यांचा परिचित असलेला अरबाज शहा याच्यावर पोलिसांकडे संशय व्यक्त केला होता. अन्सार पिंजारी यांनी आपल्यावर संशय व्यक्त केला म्हणून अरबाज शहाने अन्सार यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर त्याने बुधवारी अन्सार पिंजारी यांना भोसकून ठार केल्याची घटना घडली आहे. मयत अन्सारच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत, बोदवड पोलिस ठाण्याच्या समोर ठिय्या मांडला आहे. आरोपीला अटक करावी आणि निष्काळजी पणा करणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी केली जात आहे. आरोपीला तातडीने अटक करा आणि पोलिसावर ही कारवाई करा यासाठी आमदार चंद्रकात पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना फोन करून मागणी केली आहे. तातडीने कारवाई झाली नाही तर बोदवड बंद करण्याचा इशारा ही त्यांनी दिला आहे.

जळगाव जिल्ह्यात बोदवड येथे झालेल्याअन्सार पिंजारी खून प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्या संदर्भात सहाय्यक फौजदार रवींद्र गुरचळ आणि कॉन्स्टेबल मोहन चौधरी यांना तडकाफडकी निलंबित करण्याची कारवाई अधीक्षकांनी केली आहे. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळं अन्सार पिंजारी यांची हत्या झाल्याचा आरोप करत आमदार चंद्रकात पाटील यांनी आरोपी सह दोषी अधिकाऱ्यावंर कारवाई करण्याची मागणी केली होती. मागणी पूर्ण होईपर्यंत मृतदेह पोलिस अधीक्षक कार्यालयात नेण्याचा इशारा देखील त्यांनी दिला होता. यावेळी माध्यमाच्या समोर पोलिसांच्या विरोधात आमार चंद्रकांत पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला. बोदवड शहरातील मयत अन्सार पिंजारी याच्या घरी आठ मे रोजी चोरी झाली. या चोरी प्रकरणात मयत अन्सार यांनी त्यांच्या परिचित अरबाज शहावर संशय व्यक्त केला होता. मात्र आपल्यावर संशय व्यक्त केल्याने अरबाज हा सातत्याने अन्सार पिंजारी यांना जीवे मारण्याच्या धमक्या देत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon