१ जूनपासून एसटी बसस्थानकांवरील सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा

१ जूनपासून एसटी बसस्थानकांवरील सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा

पोलीस महानगर नेटवर्क 

मुंबई : राज्यातील एसटी बसस्थानकांवरील प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १ जूनपासून राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतागृहे प्रवाशांसाठी मोफत करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

राज्यातील बसस्थानकांवरील अस्वच्छता आणि अपुऱ्या सुविधांबाबत प्रवाशांकडून वारंवार तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. बसस्थानकांचा कायापालट करून कायमस्वरूपी स्वच्छता राखण्यासाठी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक बसस्थानकावर प्रवासी सुविधांसंदर्भातील संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यामुळे प्रवाशांना तक्रारी आणि सूचना थेट संबंधित यंत्रणेकडे पोहोचवणे सुलभ होणार आहे.

तसेच, परिवहन विभागाने नावे बदललेल्या गावांचा अद्ययावत वापर करावा आणि व्याकरणदृष्ट्या शुद्ध मराठी भाषेचा वापर सुनिश्चित करण्यासाठी परिपत्रक जारी करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

“प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे,” असे प्रताप सरनाईक यांनी अधोरेखित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon