जमिनीच्या वाटपाच्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या; वडील, सावत्र आई अन् सावत्र भावावर गुन्हा दाखल

जमिनीच्या वाटपाच्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या; वडील, सावत्र आई अन् सावत्र भावावर गुन्हा दाखल

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – बारामती तालुक्यातील जोगवडी परिसरात जमिनीच्या वाटपाच्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी मृत तरुणाच्या वडीलांसह सावत्र आई आणि सावत्र भावाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सूरज संजय गुरुमकर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी रात्री त्यांचा मृतदेह घराशेजारील परिसरात आढळून आला. डोक्यावर गंभीर वार झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुमकर कुटुंबामध्ये गेल्या काही दिवसांपासून जमिनीच्या वाटपावरून वाद सुरू होता. याच वादातून सूरज यांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच वडगाव निंबाळकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी मृताचे वडील संजय गुरुमकर, सावत्र आई माया गुरुमकर आणि सावत्र भाऊ अर्थव गुरुमकर यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून संबंधितांची चौकशी सुरू असून पुढील तपास करण्यात येत आहे.

बारामती तालुक्यातील जोगवडी परिसरात जमिनीच्या वाटपाच्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी मृत तरुणाच्या वडील, सावत्र आई आणि सावत्र भावाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हत्या झालेल्या तरुणाचे नाव सूरज संजय गुरुमकर असे आहे. त्यांचा मृतदेह परवा रात्री घराशेजारील परिसरात आढळून आला. डोक्यात वार करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पूर्वीपासून सुरू असलेल्या जमिनीच्या वाटपाच्या वादातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. वडगाव निंबाळकर पोलिसांनी मृताचे वडील संजय गुरुमकर, सावत्र आई माया गुरुमकर आणि सावत्र भाऊ अर्थव गुरुमकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon