शिरढोणच्या सार्थक पाटीलचा दहावीत झेंडा; ९३.४० टक्क्यांसह शाळेत प्रथम

शिरढोणच्या सार्थक पाटीलचा दहावीत झेंडा; ९३.४० टक्क्यांसह शाळेत प्रथम

निळजे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात निळजे येथील रवींद्रनाथ टागोर न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी सार्थक सोमनाथ पाटील याने ९३.४० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या या यशामुळे शिरढोण गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

शाळेचा यंदाचाही निकाल शंभर टक्के लागला असून सलग पाचव्या वर्षी ही परंपरा कायम राखण्यात शाळेला यश आले आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान विषयांसाठी संचालक महेंद्र पाटील यांचे, तर इंग्रजी व समाजशास्त्र विषयांसाठी मुख्याध्यापिका चांदणी तिजारे यांचे मार्गदर्शन लाभले.

मूळचा शिरढोण येथील रहिवासी असलेल्या सार्थकने सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबीयांचा पाठिंबा यामुळेच हे यश मिळाल्याची भावना त्याने व्यक्त केली.

सार्थकने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, कुटुंबीय आणि शाळेतील शिक्षकांना दिले आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे संचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिरढोण व निळजे परिसरातील ग्रामस्थांकडून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon