चांदूर रेल्वे पोलिसांची जुगार अड्ड्यांवर धडक; १० जणांविरुद्ध गुन्हे, ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

चांदूर रेल्वे पोलिसांची जुगार अड्ड्यांवर धडक; १० जणांविरुद्ध गुन्हे, ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलीस महानगर नेटवर्क

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे परिसरात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत १० आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून तब्बल चार लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चांदूर रेल्वे पोलिसांनी ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली केली. पोलिस उपनिरीक्षक नितेश अजडे आणि त्यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एकाचवेळी तीन जुगार अड्ड्यांवर धाड टाकली. छाप्यादरम्यान रोख रक्कम, जुगार साहित्य तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले.

पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे नोंदवले असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. “कायद्याला आव्हान देणाऱ्या कोणत्याही अवैध कृत्याला पाठीशी घातले जाणार नाही. अशा कारवाया यापुढेही सुरू राहतील,” असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon