दहावीचा निकाल उद्या जाहीर; दुपारी १ पासून ऑनलाईन उपलब्ध

दहावीचा निकाल उद्या जाहीर; दुपारी १ पासून ऑनलाईन उपलब्ध

पोलीस महानगर नेटवर्क 

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे घेण्यात आलेल्या दहावी (एसएससी) परीक्षेचा निकाल शुक्रवारी (८ मे) जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार असल्याची माहिती मंडळाने दिली आहे.

निकाल पाहण्यासाठी मंडळाने अधिकृत संकेतस्थळांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थी mahresult.nic.in⁠� तसेच sscresult.mkcl.org⁠� या संकेतस्थळांवर जाऊन आपला सीट नंबर व आवश्यक तपशील भरून निकाल पाहू शकणार आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो विद्यार्थी या निकालाची प्रतीक्षा करत असून, निकालानंतर पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मंडळाकडून विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळांवरूनच निकाल पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon