सफाळेतील मोरवणे डॅम्पमध्ये बुडून युवकाचा मृत्यू
सर्पमित्रांच्या शोध मोहिमेनंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश
पालघर / नवीन पाटील

सफाळे पूर्वेकडील नारोडा येथील यज्ञेश प्रमोद सांबरे (वय २०) याचा रोडखड येथील मोरवणे डंपमध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र पिंट्या मानकर, येशू डिमेलो, ओमकार मिठबावकर व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत डॅम्पमध्ये शोधमोहीम सुरू केली. सुमारे अर्धातासाच्या अथक प्रयत्नांनंतर यज्ञेश याचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आला.
या प्रकरणाची नोंद सफाळे पोलिस ठाण्यात करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे. घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.