खडसेंवर साखर कारखाना जमीन घोटाळा प्रकारणात गुन्हा दाखल; खडसेंसह मुलगीही सहआरोपी

Spread the love

खडसेंवर साखर कारखाना जमीन घोटाळा प्रकारणात गुन्हा दाखल; खडसेंसह मुलगीही सहआरोपी

योगेश पांडे / वार्ताहर

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या मानपुर येथील जमीन गैरप्रकार प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे व त्यांची कन्या शारदा खडसे यांच्या विरोधात बोदवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. एकनाथ खडसे व शारदा खडसे त्यांच्या विरोधात फसवणुकीसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२००२ मध्ये साखर कारखान्याच्या नावाखाली मानपुर शिवारातील महार वतनाची गट क्रमांक १२२ जमीन एकनाथ खडसेंनी विकत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. एकनाथ खडसेंनी जमीन खरेदी करताना चमेली बाई तुकाराम तायडे यांच्या वारसांना चांगला मोबदला व साखर कारखान्यात रोजगार मिळवून देण्याचे दिले होते आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन पूर्ण न झाल्याचे तक्रारीत आरोप करण्यात आले आहेत. मात्र साखर कारखान्यासाठी जमीन घेऊनही सदर जमीन ही शारदा एकनाथराव खडसे यांच्या नावावर असल्याचे समोर आल्याने याप्रकरणी चमेली बाई तुकाराम तायडे यांनी जिल्हाधिकारांकडे तक्रार केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon