नालासोपाऱ्यात शिर नसलेला मृतदेह सापडल्याने खळबळ; टॅटूमुळे मृतदेहाची ओळख पटली, घटनेनं परिसर हादरला
योगेश पांडे / वार्ताहर
नालासोपारा – नालासोपारा येथील पेल्हार पोलीस ठाणे परिसरातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका निर्जनस्थळी मृतदेहाला शिर नसल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे. संबंधित मृतदेह एका पोत्यात भरून ठेवला होता, पण त्या मृतदेहाला शिरच नव्हते. या घटनेनं परिसर हादरून गेला होता.
घडलेल्या घटनेनुसार, सोमवारी सकाळी ९ वाजताच्यासुमारास, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाजवळ आणि प्रभात पेट्रोल पंपानजीक अंबा पाडा येथील वस्तीचा भाग असलेल्या ठिकाणी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. नंतर तात्काळपणे पोलिसांनी या घटनेची माहिती देण्यात आली होती.संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच, पेल्हार पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला होता. तपासादरम्यान फॉरेन्सिक पथकाने आणि श्वानपथकाला घटनास्थळी दाखल केले होते. पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा सुरु केला असून, मृतदेह ताब्यात घेऊन या प्रकरणाचा पुढील तपास केला.
पोलीस सध्या मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. संबंधित प्रकरणात प्राथमिक माहितीनुसार, मृत व्यक्तीच्या हातावर अशोक सिंग अशा नावाचा टॅटू गोंदवण्यात आला होता. पोलीस आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून प्रकरणाचा तपास करत आहेत.