पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या; पत्नीवर बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Spread the love

पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या; पत्नीवर बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

योगेश पांडे / वार्ताहर

बोईसर – बोईसरमधील सालवड परिसरात राहणाऱ्या ३९ वर्षीय सतीश मोरे या व्यक्तींने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. या घटनेत त्यांच्या पत्नीवर मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आलेला असून बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्या आलाय.

मिळालेल्या माहितीनुसार,सतीश मोरे आणि त्यांच्या पत्नीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वैवाहिक जीवनात वाद सुरु होते. त्यातून ते मानसिक तणावात होते. अखेर यांनी दररोजच्या छळाला कंटाळून त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे.

घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरु केला असून सतीश मोरे याच्यां पत्नी प्रियंकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.सतीश यांच्या कुटुंबीयांनी प्रियकांच्या सततच्या वागणुकीमुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान पोलिस अधिक तपास करत असून परिस्थिती काय होती याचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon