गोळीबाराच्या घटनेनं पुणे हादरलं; एक तरुण गंभीर जखमी

Spread the love

गोळीबाराच्या घटनेनं पुणे हादरलं; एक तरुण गंभीर जखमी

योगेश पांडे / वार्ताहर

पुणे – गोळीबाराच्या घटनेनं पुणे हादरलं आहे. पुण्यातील मुंढवा परिसरातील केशवनगर येथे धक्कादायक गोळीबाराची घटना समोर आली आहे. गुरुकृपा सोसायटीच्या पाठीमागे ही गोळीबाराची घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, महाकाल टोळीने हा गोळीबार केल्याचा आरोप आहे. या गोळीबारात हरीश जाधव गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सक्षम गायकवाड, ओम गायकवाड, सोनू मुंडे आणि सुमित वर्णवाले या आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.

प्राथमिक तपासात हा गोळीबार वर्चस्वाच्या वादातून झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे मुंडवा परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon