छत्रपती संभाजीनगरमधील बेकायदेशीरपणे गर्भलिंगनिदान आणि गर्भपात करवून देणारा मोठं रॅकेट उघड; दोन मुख्य हस्तकांना अटक

Spread the love

छत्रपती संभाजीनगरमधील बेकायदेशीरपणे गर्भलिंगनिदान आणि गर्भपात करवून देणारा मोठं रॅकेट उघड; दोन मुख्य हस्तकांना अटक

योगेश पांडे / वार्ताहर

छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव परिसरात बेकायदेशीरपणे गर्भलिंगनिदान आणि गर्भपात करवून दिला जात असल्याचं रॅकेट उघडकीस आलं आहे. या रॅकेटची पाळेमुळे खोलवर असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे.

एमआयडीसी सिडको पोलिसांनी शनिवारी पिसादेवी भागात सापळा रचून या प्रकरणातील दोन मुख्य हस्तकांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अटकेतील एका आरोपीने केवळ यूट्यूबवरून लिंगनिदान करण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. वॉर्डबॉय राहुल माणिकराव झोंड आणि डॉ. सतीश सोनवणे याचा जुना चालक सोमनाथ परसराम बारसे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने दोघांना २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या रॅकेटबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी एका महिला कर्मचाऱ्याला डमी पेशंट बनवून सापळा रचला. लिंगनिदानासाठी १४ हजार रुपयांचा सौदा ठरवण्यात आला होता. ठरल्याप्रमाणे आरोपी पिसादेवी परिसरात कारमधून आले असता पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले. आरोपींकडून विदेशी बनावटीचा पोर्टेबल सोनोग्राफी प्रोब आणि एक टॅब जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉ. सतीश सोनवणे आणि संबंधित महिलेचा पती सपकाळ हे अद्याप फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

७ मार्च रोजी संपूर्ण मराठवाड्यात गर्भपाताचं भयानक रॅकेट चालविले जात असल्याचं समोर आलं होतं. हे रॅकेट चालविणारा डॉ. सोनवणे, जालन्यातली परिचारिका कमळ गोकुळ तीनगोटे, मयूर पार्कचा महालॅब चालक अनिल जाधव यांनी नारेगावात २६ वर्षीय विवाहितेचा घरातच गर्भलिंगनिदान करुन गर्भपात केला. विवाहितेच्या वडिलांमुळे हा प्रकार समोर आला. यानंतर पोलिसांनी डमी पती-पत्नी पाठवून हे रॅकेट उद्ध्वस्त केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon