परिमंडळ ३ कल्याणमध्ये स्वच्छतेचा धडाका खडकपाडा–बिर्ला कॉलेज ते दुर्गाडी मार्गावर पोलीस-स्वयंसेवकांची संयुक्त मोहिम

Spread the love

परिमंडळ ३ कल्याणमध्ये स्वच्छतेचा धडाका
खडकपाडा–बिर्ला कॉलेज ते दुर्गाडी मार्गावर पोलीस-स्वयंसेवकांची संयुक्त मोहिम

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण : नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने परिमंडळ ३, कल्याण अंतर्गत शनिवारी (१ मार्च) सकाळी भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र पोलीस (गृह विभाग) यांच्या संयुक्त पुढाकारातून ही मोहिम सकाळी ७.३० वाजल्यापासून खडकपाडा सर्कल ते बिर्ला कॉलेज मुख्य रस्ता तसेच खडकपाडा सर्कल ते दुर्गाडी मुख्य रस्ता या मार्गांवर राबविण्यात आली.

या अभियानात पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ३) अतुल झेंडसो, सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रांत अधिकारी, कल्याण) शेजवळ, खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी, परिमंडळातील सर्व पोलीस ठाण्यांचे कर्मचारी, कल्याण कंट्रोल रूम व पोलीस उप आयुक्त कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले. एकूण ४० अधिकारी व २१० अंमलदार, तसेच प्रतिष्ठानचे १७५ स्वयंसेवक यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.

रस्ते, फूटपाथ आणि सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा संकलित करून परिसर स्वच्छ करण्यात आला. स्वच्छ व सुंदर शहरासाठी पोलीस प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या स्वच्छता मोहिमेसाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका तसेच डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांनी विशेष सहकार्य केले. शहरातील स्वच्छतेसाठी पुढेही अशा उपक्रमांची मालिका राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon