मुलानं केलेल्या प्रेमकरणानंतर बापाने गमावला जीव!

Spread the love

मुलानं केलेल्या प्रेमकरणानंतर बापाने गमावला जीव!

बोईसरच्या चिकन भुजंग सेंटरमध्ये कामाला असलेली मुलगी मुलासोबत पळून गेली; मालकाने मुलाच्या वडिलांच्या डोक्यात झाडली गोळी

योगेश पांडे / वार्ताहर

पालघर – मुलानं केलेल्या प्रेमकरणानंतर बापाला जीव गमवावा लागल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार पालघरमध्ये घडला. बोईसरच्या पूर्वेस असलेल्या महागाव परिसरात रात्रीच्या सुमारास फायरिंग झाल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, ही फायरिंग प्रेमप्रकरणातून असल्याचे समोर आले. चिकन भुजिंग सेंटरमध्ये कामाला असलेली मुलगी एका मुलासोबत पळून गेल्याचा राग मनात धरून भुजिंग सेंटरच्या मालकाने फायरिंग केली. या फायरिंगमध्ये सुरेश वरखडे यांच्या डोक्याला गोळी लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार बोईसरच्या पूर्वेस असलेल्या महागाव परिसरामध्ये चिकन भुजंग सेंटर होतं. या चिकन भुजंग सेंटरमध्ये मुलगी कामाला होती. या ठिकाणी मुलगा सुद्धा कामाला होता. मात्र, त्या मुलासोबत मुलगी पळून गेल्यानंतर चिकन भूजिंग सेंटरचा मालक चांगलाच संतापला. त्याने मुलीला पळवून नेलेल्या मुलाच्या वडिलांवर थेट फायरिंग केली. या फायरिंगमध्ये सुरेश वरखडे गंभीर जखमी झाले आहेत. अत्यंत गंभीर अवस्थेत त्यांना बोईसरमधील लाईफ लाईन्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान चिकन भूजिग सेंटरचा मालक फायरिंग करून फरार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास आता बोईसर पोलिसांकडून केला जात आहे. मात्र, चिकन भूजिंग सेंटरमधल्या मालकाने काम करत असलेली मुलगी पळून गेली म्हणून मुलाच्या वडिलांवर फायरिंग केल्याने भूवया उंचावल्या आहेत. पोलिस तपासामध्येच आता खरं कारण समोर येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon