अजित पवारांचा घातपाताचा संशय! बारामतीमधील आणखी एक गाव बंद; अधिवेशनाच्या सुरुवातीलाच वेगळाच पॅटर्न

Spread the love

अजित पवारांचा घातपाताचा संशय! बारामतीमधील आणखी एक गाव बंद; अधिवेशनाच्या सुरुवातीलाच वेगळाच पॅटर्न

योगेश पांडे / वार्ताहर

बारामती – दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत दिवसेंदिवस संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे. अजित दादांचा अपघात की घातपात? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून राज्य सरकारने या अपघाताची सखोल चौकशी करावी आणि सत्य बाहेर आणावे या मागणीसाठी बारामती तालुक्याती डोर्लेवाडी गाव सोमवारी बंद ठेवण्यात आले.

अशातच, अजित पवारांचा अपघाताचा तपास व्हावा या मागणीसाठी रविवारी बारामती तालुक्यातील लोणी भापकर हे गाव बंद ठेवण्यात आले होते. यावेळी लोणी भापकर ग्रामपंचायतीने पोलीस निरीक्षकांना पत्र लिहत सखोल चौकशीची मागणी केली होती. असे असताना अजित पवारांच्या घातपाताचा संशय व्यक्त करत बारामतीमधील आणखी एका गावामध्ये बंद पुकारण्यात आला आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या सुरुवातीलाच वेगळाच पॅटर्न बघायला मिळत आहे.

अजितदादांच्या निधनाबाबत प्रसारमाध्यमांमध्ये सुरु असणाऱ्या बातम्या पाहता आम्हाला अजित पवार यांचा घातपात झाल्याचा संशय आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी, यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निवेदन देणार आहेत. अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला त्या घटनेची सखोल चौकशी व्हावी, यासाठी बारामतीतील प्रशासकीय भावना बाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमले. प्रांत अधिकारी यांना दिवेदन देऊन सरकारने याची सखोल चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करणार. कार्यकर्त्यांना अजित पवारांचा झालेला विमान अपघात हा घातपात वाटतो आहे. अशी शंका या कार्यकर्त्यांनी बोलताना व्यक्त केली.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत स्व. अजित पवार यांच्या स्मरणार्थ शोकप्रस्ताव मांडला गेला. पारंपरिक पद्धतीनुसार हा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडून मांडण्यात आले आणि त्यांच्याच हस्ते वाचून दाखवला. मात्र, यावेळी अनेक सदस्यांनी अजित पवार यांच्या कार्याबाबत सभागृहात मनोगत व्यक्त करण्याची इच्छा व्यक्त केल्याने शोकप्रस्तावावर विशेष चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, विविध पक्षांचे गटनेते तसेच प्रत्येक पक्षातील सदस्यांनी सभागृहात आपली भावना व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon