खोबऱ्याच्या तुकड्यावरून वाद विकोपाला; कल्याणमध्ये महिलेला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

Spread the love

खोबऱ्याच्या तुकड्यावरून वाद विकोपाला; कल्याणमध्ये महिलेला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण : किरकोळ कारणावरून दोन कुटुंबांमध्ये तुफान राडा झाल्याची धक्कादायक घटना कल्याण येथील पिसवली गावात घडली. रस्त्यावर वाळत घातलेल्या खोबऱ्याच्या तुकड्यावरून सुरू झालेला वाद थेट झटापटीपर्यंत पोहोचला असून, या घटनेत एका महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिसवली गावातील एका चाळीत शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये हा वाद झाला. एका कुटुंबाने रस्त्यावर खोबरे वाळत घातले असताना, खेळता खेळता आठ वर्षांच्या मुलाने त्यातील एक खोबऱ्याचा तुकडा उचलला. या साध्या घटनेवरून शेजारील कुटुंबाने वाद घातला. शाब्दिक चकमकीनंतर वादाचे रूपांतर झटापटीत झाले. आरोपींनी मुलाच्या आईला शिवीगाळ करत मारहाण केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

या मारहाणीचा प्रकार स्थानिक व्यक्तीने मोबाईल कॅमेऱ्यात टिपला असून, व्हिडीओमध्ये महिलेला बेदम मारहाण होत असल्याचे स्पष्टपणे दिसते. या प्रकरणी पीडित महिलेने तक्रार दाखल केली असून मानपाडा पोलीस यांनी अदखलपात्र (एनसी) गुन्ह्याची नोंद केली आहे. किरकोळ कारणावरून महिलेला मारहाण झाल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon