दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून सांगलीतील दांपत्याची ९ लाखांची फसवणूक

Spread the love

दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून सांगलीतील दांपत्याची ९ लाखांची फसवणूक

पोलीस महानगर नेटवर्क

सांगली : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दामदुप्पट परतावा मिळेल, असे आमिष दाखवून सांगलीतील एका दांपत्याची तब्बल ९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सुमित राजाराम जाधव यांनी जालना येथील गणेश दुर्गादास जाधव याच्याविरुद्ध संजयनगर पोलिस ठाणे येथे फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादी सुमित जाधव यांचे आई-वडील सांगली येथील सूतगिरणी परिसरात वास्तव्यास आहेत. आरोपी गणेश जाधव याने त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास कमी कालावधीत दामदुप्पट परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यानुसार ५ जुलै रोजी ४ लाख रुपये, ६ जुलै रोजी ३ लाख रुपये रोख, तसेच नंतर बँक खात्यावरून ३ लाख रुपये अशी एकूण १० लाख रुपयांची रक्कम आरोपीने घेतली.

मात्र, ठरलेल्या मुदतीत अपेक्षित परतावा न मिळाल्याने सुमित जाधव यांच्या आई-वडिलांनी आरोपीकडे रक्कम परत देण्याची मागणी केली. त्या वेळी ही रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवलेली असल्याचे सांगत आरोपीने टाळाटाळ केली. वारंवार तगादा लावल्यानंतर आरोपीने केवळ १ लाख रुपये परत दिले; उर्वरित ९ लाख रुपये न देता फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon