शासकीय वाहनात मद्यपार्टीचा धक्कादायक प्रकार; महापौर शर्मिला पिंपोळकर यांचा कडक कारवाईचा इशारा

Spread the love

शासकीय वाहनात मद्यपार्टीचा धक्कादायक प्रकार; महापौर शर्मिला पिंपोळकर यांचा कडक कारवाईचा इशारा

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या नगर अभियंत्याच्या शासकीय वाहनात मद्यपानाची पार्टी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी सोमवारी संबंधितांवर कडक कारवाईचा इशारा दिला.

ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या पार्किंगमध्ये विविध विभागांचे अभियंते व उपायुक्त यांच्या शासकीय वाहनांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध आहे. या ठिकाणी उभी करण्यात आलेल्या एका वाहनात मद्यपानाची पार्टी झाल्याचे समोर आले आहे. संबंधित वाहन हे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्या वापरातील असल्याची माहिती आहे.

या घटनेबाबत विचारले असता महापौर पिंपोळकर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. शासकीय वाहनाचा असा गैरवापर हा गंभीर प्रकार असून यापुढे अशा घटना घडल्यास कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, या प्रकरणामुळे पालिकेतील शिस्त आणि प्रशासकीय जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, चौकशी व पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon