भिवंडी महापौर निवडणुकीपूर्वीच महायुतीमध्ये फूट, महापौर नक्की कोणाचा? ‘किंगमेकर’ कोणाला देणार साथ?

Spread the love

भिवंडी महापौर निवडणुकीपूर्वीच महायुतीमध्ये फूट, महापौर नक्की कोणाचा? ‘किंगमेकर’ कोणाला देणार साथ?

योगेश पांडे / वार्ताहर

भिवंडी – भिवंडी महानगरपालिकेतील महापौर निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापले असून, महायुतीमध्ये फूट आणि विरोधकांतील अंतर्गत नाराजीमुळे सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू असताना, किंगमेकरची भूमिका कोण निभावणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकत्र येत ‘भिवंडी सेक्युलर फ्रंट’ची स्थापना करण्यात आली. या आघाडीकडून महापौर पदासाठी तारीक मोमीन यांचे नाव जाहीर करण्यात आले. मात्र, समाजवादी पक्षाचे सहा नगरसेवक काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतृत्व करणारे आमदार रईस शेख यांच्यावर नाराज असल्याने त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीची साथ सोडली. समाजवादी पक्षाने थेट महापौर पदाची मागणी केल्याने आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. काँग्रेसकडून अद्याप या मागणीला होकार देण्यात आलेला नाही. परिणामी काँग्रेस-राष्ट्रवादीचा आकडा ४२ वरच अडकला असून, बहुमत गाठण्यात अडचण निर्माण झाली आहे.

एकीकडे काँग्रेस समाजवादी पक्षाची नाराजी दूर करण्यात यशस्वी ठरेल का, तर दुसरीकडे महायुतीतील अंतर्गत वाद मिटणार का, हा मोठा प्रश्न आहे. बहुमताचा आकडा नक्की कोण गाठणार आणि भिवंडीचा महापौर कोण होणार, याबाबत सध्या तरी चित्र अस्पष्ट असून, राजकीय घडामोडींमुळे अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon